मिलेटस- देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य
एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ते दोघे न्यायासाठी धर्मराजकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यं बाहेर काढली जातात तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी तशीच असते. ह्या गोष्टीतून कळतं की, नाचणी जास्त काळ टिकणारं धान्य आहे, म्हणजेच लोकांचं धान्य आहे. म्हणून ह्या वर्गातील धान्यांना रामधान्ये म्हणतात. कारण राम हा लोकांचा राजा होता. भारतातील काही राज्यांमध्ये मिलेटला देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारे) म्हणतात. महाराष्ट्रात मिलेटसाठी पोषकधान्य हा शब्द रुजत आहे. इंग्रजीत त्यांना मिलेट (Millet) म्हणतात. मिनी म्हणजेच लहान आकाराच्या एका दाण्यापासून असंख्य दाणे मिळवता येतात. अगदी यजुर्वेदमध्ये मिलेटबद्दल लिहिलेले आढळते. याचाच अर्थ भारतात कांस्ययुगापासून मिलेट खाल्ले जाते.(इ.स.पूर्व ४५००). भारताव्यतिरिक्त आफ्रिका, चीन, जापान, कोरिया आदी देशांमध्ये फार पूर्वीपासून मिलेट खाल्ले जात असल्याचे पुरावे आढळतात. थोडक्यात काय तर आपले पूर्वज तांदूळ व गहू न खाता मि...