काटेसावर व पक्षी विविधता

काटेसावर / Red silk cotton / Bombax ceiba Linn) हे आपल्या भारतातील एक अतिशय सुंदर झाड. या झाडाच्या खोडापासून ते फांद्यापर्येंत काटे असल्याने याला काटेसावर असे म्हटले जाते. याला संस्कृत मध्ये शाल्मली असे म्हणतात. २० ते २५ मीटर उंच व ३ ते ४ मीटर रुंद हा वृक्ष उन्हाळ्याच्या सुरवातीला (फेब्रुवारी – मार्च) पर्णविरहित होऊन यावर भडक गुलाबी रंगाची फुले येतात. फुले पाच पाकळ्यांची, जाड मांसल असतात. पाने ही संयुक्त प्रकारची असून ५ ते ७ पर्णिका असतात. हे झाड Ornithophily या मध्ये येत असल्याने फुलांचा रंग हिरव्या रंगांला परस्परविरोधी असतो, वासविरहित, भरपूर गोड रस असलेली, stigma व stamens ची दिशा अशी, की पक्ष्यांच्या चोचीला, डोक्याला सहज लागणारी, “Ornithophily” म्हणजे पक्ष्याच्या मदतीने परागीभवन होणे.   काटेसावारीला दोडक्यासारख्या शेंगा (एप्रिल – मे) महिन्यात लागतात. बियांच्यावर कापूस असल्याने त्या फारच हलक्या असतात, हवेच्या मदतीने बियांचा प्रसार होतो. (Anemochory) 

काटेसावरीचे झाड

                              

काटेसावरीचे फूल


काटेसावरीची शेंग

बर्‍याचशा शोधनिबंधांमध्ये असे वाचण्यात आले आहे, की ७० ते ८० जातींचे वेगवेगळे पक्षी या झाडावर येतात. काही फुलातला रस प्यायला तर काही फुलातील किडे खायला, काही टेहळणी करायला तर काही घरटी बांधायला. मला यातल्या २० पक्ष्यांचे फोटो काढायला मिळाले ते या प्रमाणे:

Sr no

Name of the bird

Sr no

Name of the bird

1

Rufous Treepie

11

Oriental white eye

2

Ashy Drongo

12

Rose – ringed Parakeet

3

Common Myna

13

Coppersmith Barbet

4

Great Tit

14

Oriental Magpie Robin

5

Tawny – bellied Babbler

15

Plum – headed Parakeet

6

Asian pied Starling

16

Red vented Bulbul

7

Jerdon’s leafbird

17

Lesser golden back Woodpecker

8

Yellow – eyed babbler

18

Golden Oriole

9

Yellow throated sparrow

19

Large cuckoo shrike

10

Brahminy starling

 20

Indian grey Hornbill



काटेसावरीवर आढळलेले पक्षी

                    ( Photo credit – Aniruddha Bade)

या व्यतिरिक्त कापशी, हरियाल, बोलेनीचा गरुड (Newsletter ecological society,August’20) हे पक्षी सुद्धा या झाडावर पाहिले आहेत. जितक्या जास्त पक्ष्यांची विविधता काटेसावरीवर येईल तितके जास्त परागीभवन, जैविक कीडनियंत्रण होण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या पक्षी आणि झाडाच्या biological interaction मुळे दोघांनाही फायदाच होतो. पक्ष्यांमुळे परागीभवन होण्यास मदत होते. त्याव्यतिरिक्त किड्यांच्या संख्येवर सुद्धा नियंत्रण राहते. 

काटेसावरीची झाडे ही माणसालासुद्धा तेवढीच फायद्याची आहेत. व्यावसायिकदृष्ट्या, वैद्यकीयदृष्ट्या या झाडाचे बरेचसे फायदे आहेत. शेताच्या धुऱ्यावर, बगिचांमध्ये, वनीकरणाच्या जागेवर आपण हे झाड लावू शकतो. त्यामुळे देशी झाडांचे लागवड व संवर्धन तर होईलच, त्याच बरोबर मानवाला व पक्ष्यांनासुद्धा फायदा होईल. 

- अनिरुद्ध बडे.

    aniruddhabade@gmail.com


Comments

Post a Comment