Posts

Showing posts from May, 2023

April 2023 Issue

Mumbai Butterfly Meet - 22nd & 23rd April 2023 : Dr Sanjeev Shevade : The open, green ambiance of the Maharashtra Nature Park was a perfect backdrop for the inaugural Mumbai Butterfly Meet, presented by the Vivant Untamed Earth Foundation, which was held on the 22nd & 23rd April 2023. We decided to look at the Butterflies as glamorous representatives of the largest group of animals on our planet namely the insects. Over the years, they have also found place in our art, literature, culture and come to occupy a very special position in our hearts. A thriving butterfly population is an indicator of the robustness of the health of an ecosystem... मिलेटस- देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य : संतोष बोबडे : एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ते दोघे न्यायासाठी धर्मराजकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यं बाहेर काढली जातात तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी तशी...

Mumbai Butterfly Meet - 22nd & 23rd April 2023

Image
The open, green ambiance of the Maharashtra Nature Park was a perfect backdrop for the inaugural Mumbai Butterfly Meet, presented by the Vivant Untamed Earth Foundation, which was held on the 22nd & 23rd April 2023. We decided to look at the Butterflies as glamorous representatives of the largest group of animals on our planet namely the insects. Over the years, they have also found place in our art, literature, culture and come to occupy a very special position in our hearts. A thriving butterfly population is an indicator of the robustness of the health of an ecosystem.  The Butterfly Meet was principally to look at their ecological role and the rationale for their conservation, especially in an urban context. And as an extension, create a common meeting ground for butterfly lovers from Mumbai and the surrounding regions. To this end, we planned diverse activities to engage visitors across different age groups, from children to adults and from students to citizen scientists. ...

मिलेटस- देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य

Image
 एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ते दोघे न्यायासाठी धर्मराजकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यं बाहेर काढली जातात तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी तशीच असते. ह्या गोष्टीतून कळतं की, नाचणी जास्त काळ टिकणारं धान्य आहे, म्हणजेच लोकांचं धान्य आहे. म्हणून ह्या वर्गातील धान्यांना रामधान्ये म्हणतात. कारण राम हा लोकांचा राजा होता. भारतातील काही राज्यांमध्ये मिलेटला देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारे) म्हणतात.  महाराष्ट्रात मिलेटसाठी पोषकधान्य हा शब्द रुजत आहे. इंग्रजीत त्यांना मिलेट (Millet) म्हणतात. मिनी म्हणजेच लहान आकाराच्या एका  दाण्यापासून असंख्य दाणे मिळवता येतात. अगदी यजुर्वेदमध्ये मिलेटबद्दल लिहिलेले आढळते. याचाच अर्थ भारतात कांस्ययुगापासून मिलेट खाल्ले जाते.(इ.स.पूर्व ४५००). भारताव्यतिरिक्त आफ्रिका, चीन, जापान, कोरिया आदी देशांमध्ये फार पूर्वीपासून मिलेट खाल्ले जात असल्याचे पुरावे आढळतात. थोडक्यात काय तर आपले पूर्वज तांदूळ व गहू न खाता मि...

नदी रहावी नदीसारखी

तीस एक वर्षंतरी मी पुण्यात राहत असेन. पण नदी म्हटल्यावर मला अजूनही पहिल्याने आठवते ती लहानपणीची तापी. तिच्या काठावर कित्येक वेळा फिरायला गेलोय, दगड वेचलेत, कुर्डूचे कोंबडे गोळा केलेत, पोहणं तिथेच शिकलेय. गण्पती विसर्जन तिथेच, आणि संध्याकाळी फिरायलाही तिच्या काठच्या देवळापर्यंतच. शाळेची सहल तिथेच, आणि घरच्या बागेसाठी वाळू आणायलाही तिथेच. हातनूरचं पाणी सोडलं म्हणजे बंधार्‍यावरून पाणी वहायला लागायचं. मग नदीच्या पाण्याला वास यायचा नाही, पोहायला जाता यायचं. शेवाळालेल्या बंधार्‍यावरून नदीच्या मध्याच्याही पलिकडे कमी गर्दीमध्ये पोहायला जायचं. काबरा काका तर बंधार्‍यावरून त्यांची सायकलही सोबत घ्यायचे पोहायच्या जागेपर्यंत. तिथेच मग पंचांचे आडोसे करून कपडेसुद्धा बदलायचो आम्ही. पण या सगळ्याच्याही आधी, अगदी लहान असताना एका सुट्टीच्या दिवशी सकाळी सोनेरी उन्हात बाबा आणि मी दोघंच नदीवर फिरायला गेल्याची कोडॅक आठवण तर कायमचीच मनावर कोरली गेलीय. ते गाव सुटल्यावर पुन्हा कधीच तिथे गेले नाही आजवर. पण अजूनही रेल्वेने उत्तरेकडे जायची वेळ आली, तर तापी बघायला रेल्वे डब्याच्या दारात उभं रहायचं चुकत नाही. आणि माझी...

निसर्ग संवर्धनाच्या डोळस वाटा

 या शतकात माणसाची प्रगती होत असतानाच पर्यावरणाचे प्रश्न गंभीर रूप धारण करायला लागले आहेत. कमी होत चाललेले जंगल आच्छादन, नष्ट होत चाललेली जैवविविधता, जल - जमीन - वायू  प्रदुषण, वातावरणातील बदल अशी प्रश्नांची यादी मोठी आहे. प्रश्नांचे स्वरूप गंभीर बनत चालले तसे त्यावर मात करण्याची धडपड देखील सुरू झाली. पर्यावरणीय समस्या सोडवल्या नाहीत तर मानवी अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकते याची जाणीव झाल्यानंतर निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नांना गती आली. उपायांची यादी मोठी आहे. त्यापैकी वृक्षलागवड हा उपाय मोठ्या प्रमाणात अंमलात आणला जातो. भारतातील फार मोठे क्षेत्र वनखात्याच्या मालकीचे आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर वृक्षलागवड करण्यासाठी वनखाते अग्रेसर आहे. पण... वनस्पती लागवड करताना वनखात्याच्या सामाजिक वनीकरण विभागाने प्रचंड भूभागावर विदेशी वनस्पतींची लागवड केली. पटकन  व कुठेही वाढतात या दोन कारणांसाठी सुबाभूळ, ग्लिरीसिडीया, सुरू, वेडी बाभूळ या वनस्पतींची वारेमाप लागवड केली. याच काळात टणटणी, रानमारी, कॉसमॉस आदी विदेशी तणांनी अनेक अधिवासांवर आक्रमण केले. विदेशी वनस्पतींना शत्रू नसल्याने त्यांच...