Skip to main content
April 2023 Issue
- मिलेटस- देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य : संतोष बोबडे : एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ते दोघे न्यायासाठी धर्मराजकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यं बाहेर काढली जातात तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी तशीच असते. ह्या गोष्टीतून कळतं की, नाचणी जास्त काळ टिकणारं धान्य आहे, म्हणजेच लोकांचं धान्य आहे. म्हणून ह्या वर्गातील धान्यांना रामधान्ये म्हणतात. कारण राम हा लोकांचा राजा होता. भारतातील काही राज्यांमध्ये मिलेटला देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारे) म्हणतात...
- नदी रहावी नदीसारखी : गौरी बर्गी : तीस एक वर्षंतरी मी पुण्यात राहत असेन. पण नदी म्हटल्यावर मला अजूनही पहिल्याने आठवते ती लहानपणीची तापी. तिच्या काठावर कित्येक वेळा फिरायला गेलोय, दगड वेचलेत, कुर्डूचे कोंबडे गोळा केलेत, पोहणं तिथेच शिकलेय. गण्पती विसर्जन तिथेच, आणि संध्याकाळी फिरायलाही तिच्या काठच्या देवळापर्यंतच. शाळेची सहल तिथेच, आणि घरच्या बागेसाठी वाळू आणायलाही तिथेच. हातनूरचं पाणी सोडलं म्हणजे बंधार्यावरून पाणी वहायला लागायचं. मग नदीच्या पाण्याला वास यायचा नाही, पोहायला जाता यायचं. शेवाळालेल्या बंधार्यावरून नदीच्या मध्याच्याही पलिकडे कमी गर्दीमध्ये पोहायला जायचं...
- निसर्ग संवर्धनाच्या डोळस वाटा : राजीव पंडित : या शतकात माणसाची प्रगती होत असतानाच पर्यावरणाचे प्रश्न गंभीर रूप धारण करायला लागले आहेत. कमी होत चाललेले जंगल आच्छादन, नष्ट होत चाललेली जैवविविधता, जल - जमीन - वायू प्रदुषण, वातावरणातील बदल अशी प्रश्नांची यादी मोठी आहे. प्रश्नांचे स्वरूप गंभीर बनत चालले तसे त्यावर मात करण्याची धडपड देखील सुरू झाली. पर्यावरणीय समस्या सोडवल्या नाहीत तर मानवी अस्तित्व देखील धोक्यात येऊ शकते याची जाणीव झाल्यानंतर निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नांना गती आली. उपायांची यादी मोठी आहे. त्यापैकी वृक्षलागवड हा उपाय मोठ्या प्रमाणात अंमलात आणला जातो. भारतातील फार मोठे क्षेत्र वनखात्याच्या मालकीचे आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर वृक्षलागवड करण्यासाठी वनखाते अग्रेसर आहे. पण...
Comments
Post a Comment